- Events /
- Nagpanchami
Nagpanchami
आज श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण नागपंचमी शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. नागपंचमीचे महत्त्व मुलांना समजावून सांगण्यात आले. त्यासाठी सुंदर गोष्ट सांगण्यात आली तसेच माहितीपूर्ण PPT द्वारे विविध प्रकारचे साप मुलांना दाखवण्यात आले.
साप हे निसर्गाचे आणि पर्यावरणाचे महत्त्वाचे घटक असून ते आपले मित्र कसे आहेत, त्यांना का मारू नये आणि त्यांचे संरक्षण करणे का आवश्यक आहे, हे मुलांना सोप्या व रंजक पद्धतीने समजावून सांगण्यात आले.
आज सोमवार असल्याने श्रावणी सोमवारचे महत्त्व शिवमुठ तसेच भगवान शिव आणि नाग यांचे नाते याबद्दलही मुलांना माहिती देण्यात आली.
मुलांनी कणकेपासून विविध प्रकारचे नाग तयार केले. वेगळ्या नागांचे फोटो व मॉडेल्स तयार करून मांडले होते. हा आकर्षक डिस्प्ले मुलांना दाखवून त्यामागील माहितीही समजावून सांगण्यात आली.
नागपंचमीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी मुलींच्या हातावर सुंदर मेहंदी काढण्यात आली, तर मुलांसाठी आकर्षक टॅटू काढण्यात आले. अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना आपल्या सण-परंपरांची माहिती, निसर्गाविषयी प्रेम आणि प्राणीमात्रांप्रती संवेदनशीलता यांची सुंदर शिकवण मिळाली.
Latest Events
-
Rakshabandhan
रक्षाबंधन – कृतज्ञतेचा आणि सेवाभावाचा उत्सव💐 ... Read More
-
Independance Day
-
Nagpanchami
आज श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण नागपंचमी शाळ ... Read More
-
Ganapati Painting Wo ...
पालक आणि मुलांनी एकत्र येऊन रंगाविला बाप्पा
... Read More -
No Plastic Bag Day
To mark 'International Plastic Bag Free Day,' s ... Read More