ADMISSIONS OPEN

Rakshabandhan

Rakshabandhan

रक्षाबंधन – कृतज्ञतेचा आणि सेवाभावाचा उत्सव💐

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे आणि नात्याचे प्रतीक असलेला आनंदाचा सण आहे. हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो. ‘रक्षा’ म्हणजे रक्षण करणे आणि ‘बंधन’ म्हणजे गाठ किंवा नाते.

आपल्या समाजात असे अनेक घटक आहेत, जे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वेळोवेळी आपले रक्षण आणि सहकार्य करत असतात. याच भावनेतून रक्षाबंधनाचे औचित्य साधून मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ माधुरी बर्वे मॅडम यांच्या संकल्पनेतून विविध Community Helpers यांना आदरपूर्वक आमंत्रित करण्यात आले.

यामध्ये प्लंबर, कारपेंटर, टेलर, बार्बर, डॉक्टर, पोलीस कर्मचारी, तसेच मुलांना प्रेमाने आणि सुरक्षितपणे शाळेत आणणारे रिक्षाचालक व व्हॅन काका यांचा समावेश होता. तसेच आपल्या आजूबाजूला संकटात सापडलेल्या सापांना व पक्ष्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणाऱ्या सर्पमित्रांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले.

यावेळी मुलांना या सर्वांच्या कार्याची आणि समाजातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची माहिती देण्यात आली. त्यानंतर मुलांनी या मान्यवरांना राखी बांधून त्यांच्या निस्वार्थी सेवा, मदत आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

या उपक्रमातून मुलांना आपल्या सुरक्षिततेसाठी आणि सुखासाठी अनेक जण निस्वार्थपणे कार्य करत असतात, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ही आपली जबाबदारी आहे’ हा सुंदर संदेश मिळाला.

Latest Events

  • Rakshabandhan

    Rakshabandhan

    रक्षाबंधन – कृतज्ञतेचा आणि सेवाभावाचा उत्सव💐Read More

  • Independance Day

    Independance Day

  • Nagpanchami

    Nagpanchami

    आज श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण नागपंचमी शाळ ... Read More

  • Ganapati Painting Workshop

    Ganapati Painting Wo ...

    पालक आणि मुलांनी एकत्र येऊन रंगाविला बाप्पा

    ... Read More
  • No Plastic Bag Day

    No Plastic Bag Day

    To mark 'International Plastic Bag Free Day,' s ... Read More

Quick Links