ADMISSIONS OPEN
  • Events
  • /
  • Ganapati Painting Workshop

Ganapati Painting Workshop

Ganapati Painting Workshop

पालक आणि मुलांनी एकत्र येऊन रंगाविला बाप्पा

लहान मुलांचा लाडका बाप्पा, त्यांचा आवडता मित्र… ज्याची ते वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतात, तो म्हणजे गणपती बाप्पा! ❤️🙏

आज तेजोमय कलामंदिर आणि D.E.S. मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. माधुरी बर्वे मॅडम यांच्या पुढाकाराने ‘आपला बाप्पा आपणच रंगवूया’ या सुंदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

या कार्यशाळेच्या माध्यमातून पालक आणि मुलांना एकत्र वेळ घालवता आला. आपल्या हाताने बाप्पाची मूर्ती रंगवून ती आनंदाने घरी घेऊन जाण्याचा सुंदर योग सर्वांना मिळाला. या उपक्रमामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्याबरोबरच पालक-मुलांमधील नाते अधिक घट्ट झाले.

या कार्यशाळेची सुरुवात अथर्वशीर्ष गणपतीच्या श्लोकांनी करण्यात आली .या उपक्रमासाठी वापरण्यात आलेल्या पर्यावरणपूरक शाडू मातीच्या मूर्ती खास पेण येथून मागविण्यात आल्या होत्या.

बाप्पाला स्वतःच्या हाताने रंगवताना मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह खरोखरच अविस्मरणीय होता!

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!

Latest Events

  • Rakshabandhan

    Rakshabandhan

    रक्षाबंधन – कृतज्ञतेचा आणि सेवाभावाचा उत्सव💐Read More

  • Independance Day

    Independance Day

  • Nagpanchami

    Nagpanchami

    आज श्रावण महिन्यातील महत्त्वाचा सण नागपंचमी शाळ ... Read More

  • Ganapati Painting Workshop

    Ganapati Painting Wo ...

    पालक आणि मुलांनी एकत्र येऊन रंगाविला बाप्पा

    ... Read More
  • No Plastic Bag Day

    No Plastic Bag Day

    To mark 'International Plastic Bag Free Day,' s ... Read More

Quick Links